तुमची मुलगी काय करते? ही मालिका २० डिसेंबरपासून, सोम.-शनि. रात्री १० वा. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.आई मुलासाठी काहीही करू शकते. एक शिक्षिका, एक कर्तव्यदक्ष आई आणि स्वतःच्या मुलीच्या जीवावर बेतल्याने वाघीण झालेली आई या अशा धाडसी भूमिकेत मधुरा वेलणकर दिसणार आहे.
सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच थरार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेचे कथा-पटकथा लेखन अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर, तर संवाद लेखिका मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे.
आपल्या मुलासाठी जिवाची बाजी लावून गड उतरलेली हिरकणी असो किंवा स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांना धडे देणाऱ्या जिजामाता असो. आईचं अस्तित्व तिच्या मुलासाठी नेहमीच कवच बनलं आहे. आपल्या मुलांच्या चुका पदरात घेणारी आणि वेळप्रसंगी मुलांची ढाल होणारी, ही आईची दोन रुपं आहे . मुलांच्या जीवावर बेतल्यावर काहीही करायला तयार असणारी आई आणि तिची रूपं ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वतः ला झालेला त्रास आई एकवेळेस सहन करेलही पण तिच्या मुलांच्या वाटेला कोणी गेलं तर ती वाघीण व्हायला देखील मागेपुढे बघणार नाही.
ए