दुर्मिळात दुर्मिळ रक्ताची होती आवश्यकता
दैनिक सिंधुदुर्ग समाचार
डॉ. देशपांडे रुग्णालयात श्री.विजय प्रभू या रुग्णाना बी निगेटिव्ह या दुर्मीळ बी निगेटीव्ह रक्तगटाची तातडीने आवश्यकता होती.त्यांनी मदतीसाठी युवा रक्तदाता संघटनेला हाक दिली आणि युवा रक्तदाता संघटना रुग्णाच्या मदतीला नेहमीप्रमाणे धावून जात दुर्मिळात दुर्मिळ असलेला बी निगेटिव्ह हा रक्तगट उपलब्ध करून दिला.
रक्तदात्यांमध्ये कुडाळ येथील श्री. मनोहर दामले आणि सावंतवाडी येथील श्री सिद्धेश सावंत यांचा समावेश आहे. युवा रक्तदाता संघटनेने कुडाळ येथे जात रक्तदात्याना आणण्याची व्यवस्था केली. श्री. मनोहर दामले आणि श्री सिद्धेश सावंत यांचे त्यानी ‘रक्ताचे नाते’ जपल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.