तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागासह संपूर्ण जिल्ह्यात वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.
वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. उद्या आणि परवा असा दोन दिवस फडणवीस यांचा हा पाहणी दौरा असणार आहे.
या दौऱ्यात उद्या ते रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. तर परवा रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.