देश-विदेश: बोगद्यामध्ये अडकले 41 कामगार, 10 दिवसांनंतर समोर आली आतमधील ह्रदयद्रावक परिस्थिती

0
34
उत्तरकाशी,
बोगद्यामध्ये अडकले 41 कामगार;10 दिवसांनंतर समोर आली आतमधील ह्रदयद्रावक परिस्थिती

उत्तराखंड- मधील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात माती कोसळून मोठी दुर्घटना घडली, यामुळे मजूर आतमध्ये अडकले आहे. स्थानिक प्रशासनासह केंद्रीय यंत्रणा या बचावकार्यात गुंतले आहेत. आता या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-केंद्र-शाळेत-राष्ट-2/

उत्तरकाशीतील सिल्क्यरा 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे. या मजुरांना पाईपद्वारे अन्न आणि ऑक्सिजन पुरवठा सुरु आहे. आता या पाईपद्वारे इंडोस्कोपिक कॅमेरा पाठवून कामगारांची परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे बोगद्याच्या आतील मजुरांची परिस्थिती समोर आली आहे.

सिल्क्यारा येथील बोगदा दुर्घटनेच्या बचावकार्याला आज पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मागील 10 दिवसांपासून हे मजूर येथे अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत आहे. सध्या एंडोस्कोपिक फ्लॅक्सी कॅमऱ्याद्वारे मजुरांना मदत केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here