सीतरंग चक्रीवादळाने बांगलादेशात दाखल झाले आहे. या चक्रीवादळाने बांगलादेशात धुमाकूळ घातला आहे. याठिकाणी आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एएफपीने आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने बरगुना, नरेल, सिराजगंजसह भोला बेट जिल्ह्यातील 35 लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती दिली आहे. प्रभावित भागातील हजारो लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/bollywood-अभिनेता-सलमान-खान-याच्य/
हवामान विभागाने सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नसल्याची महत्वाची माहिती दिली आहे. ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात सुमारे 8 दशलक्ष लोकांच्या घरातून वीज कट झाली आहे, त्यामुळे हे लोक अंधारात आहेत. बांगलादेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळामुळे दहा हजार घरांचे नुकसान झाले, तर सह हजार हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झालं आहे. या वादळाचा मासेमारी व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक मासेमारी प्रकल्प या चक्री वादळात वाहून गेले आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशभरात जवळजवळ दिवसभर मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे दक्षिणेकडील आणि नैऋत्य बांगलादेशच्या किनारपट्टीवरील अनेक भागात पाणी साचले. https://sindhudurgsamachar.in/goa-गोवा-रेडक्रॉसतर्फे-सेवा/


