नवी मुंबईत बनावट ‘मनपा अधिकारी’ जेरबंद…वाशी वॉर्ड ऑफिसर सुखदेव येडवे यांच्या सहकार्याने वाशी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0
29
वाशी वॉर्ड ऑफिसर सुखदेव येडवे यांच्या सहकार्याने वाशी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
नवी मुंबईत बनावट ‘मनपा अधिकारी’ जेरबंद...वाशी वॉर्ड ऑफिसर सुखदेव येडवे यांच्या सहकार्याने वाशी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी असल्याचे भासवत नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या भामट्याला वाशी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांच्या तात्काळ दखल आणि योजनाबद्ध मदतीने वाशी पोलिसांनी ही कारवाई केली. www.sindhudurgsamachar.in

यापूर्वी संशयिताने सानपाड्यातील एका फ्लॅट मालकाला मालमत्ता सील करण्याची धमकी देत १ लाख रुपये क्यूआर कोडद्वारे उकळले होते. तसेच बेलापूर विभागातूनही सुमारे ४० हजार रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या व्यक्तीने वाशी परिसरातही विविध ठिकाणी मनपा अधिकारी असल्याचा आव आणून दुकानदार, घरमालक व इतरांकडून पैसे उकळण्याचाच कट रचला होता. याची माहिती मिळताच वॉर्ड ऑफिसर सुखदेव येडवे यांनी त्वरित वाशी पोलिसांशी संपर्क साधत तातडीची कारवाई करण्याची सूचना दिली.

यानंतर वाशी पोलिसांनी गोपनीय माहिती गोळा करून संशयिताच्या हालचालींवर काटेकोर पाळत ठेवली आणि योग्य क्षणी सापळा रचत त्याला रंगेहात जेरबंद केले. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अशा बनावट अधिकाऱ्यांच्या गंड्याला धक्कादायक आळा बसला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत असून, आणखी किती जण सदर गुन्ह्यात सहभागी असून किती जणांची फसवणूक झाली आहे याचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here