नांदेडमधील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन

0
116
आमदार रावसाहेब अंतापूरकर

नांदेडमधील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर (वय 55) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते.अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते . येथेच रात्री त्यांचे निधन झाले.अशोक चव्हाण यांनी अंतापूरकर यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. चव्हाणांचे त्यांच्यासोबत निकटचे संबंध होते.

अंतापूरकर हे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. चव्हाण यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत म्हटले की, ‘माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना’, असे ट्वीट चव्हाण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here