पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेत अखेर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.मंत्रिपदाच्या लालसेपोटी मी राजीनामा देणार नाही असे सांगत आपल्याला आणि आपल्या ताई प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले नाही यावर अनेक समर्थकांनी राजीनामे दिले होते. त्या सर्वांचे राजीनामे आपण नामंजूर करत असल्याची घोषणा यावेळी पंकजा मुंडे यांनी केली.
मला राजकारणात आणले ते आमदार किंवा मंत्री होण्यासाठी आणलेले नव्हते. मुंडे साहेबांनी आपल्या माणसांसाठी,सामान्य माणसाच्या हक्कासाठी युद्ध केले होते. त्याच युद्धात सामान्य माणसांना न्याय देता यावा म्हणून मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणले होते असेही त्या म्हणाल्या. तुम्ही माझे कुटुंब आहात. माझे कार्यकर्ते माझे कुटुंब आहे. त्यांचे मी खूप-खूप आभार मानते. मला सत्तेची लालच नाही. मी लालची नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी मी राजीनामा देईल असे तुम्हाला वाटते का? असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.मी या जगाला गोपीनाथ मुंडे हे नाव विसरू देणार नाही. तुम्हाला गोपीनाथ मुंडे यांचा अंत्यविधी आठवत असेल. त्यावेळी सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात शंका होत्या. आक्रोष होता. कित्येकांनी मुंडन केले होते. पण, त्यावेळी मी साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील साहेबांविषयीचे प्रेम पाहिले. त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा पाहिली. ते फक्त माझे नव्हे, तर त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी वडील होते. मुंडे साहेबांना, एका सामान्य माणसाला सत्ता मिळाली, मंत्रिपद मिळाले ते नियतीने सामान्य काढून घेतले. मी ते नियतीशी भांडून घेणार आहे. मी म्हटले नव्हते की मी मुंडेंची वारसदार आहे किंवा त्यांची मुलगी आहे. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असे मला वाटले होते, मुंडे साहेबांना वाटले होते. मी तर स्वतः मी मंत्रिपद नाकारले. त्यावेळी माझे अस्तित्व पणाला लागले होते. आपल्याकडे काही नाही असे वाटले होते. मी आधी जे मंत्रिपद नाकारले त्या मंत्रिपदासाठी मी राजीनामा देणार आहे असे तुम्हाला वाटते का?
आमच्याच भागातील आपल्या समाजातील ज्येष्ठ नेते भागवत कराड यांना संधी मिळाली आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवी आणि वयाने मोठे आहेत. मला विचारले जाते की तुमचे नेते कोण आहेत. मी सांगते माझे नेते अमित शहा आहेत, माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.