‘पावनखिंड’ 31 डिसेंबरला येणार भेटीला

0
158
'पावनखिंड' चित्रपट

दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती. प्रेक्षकांची ही आतुरता आता संपणार आहे, येत्या 31 डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची ही विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.पावनखिंडीचा रणसंग्राम आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे.‘पावनखिंडीचा’ थरार दर्शविणारे चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सैन्यदलातील अनके अनमोल रत्नांपैकी असलेले हे एक रत्नं ! आज ३६१ वर्षांचा काळ लोटला असला तरी बाजीप्रभूंचा पावनखिंडीतला रणसंग्राम महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो. बाजीप्रभूंची वीरता ,राजांवरील नितांत प्रेम आणि स्वराज्यापोटी असलेला स्वाभिमान,प्रेम याचे दर्शन घडवितो.या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार असून मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण यामुळे ‘पावनखिंड’ची शौर्यगाथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here