पॅरामेडिकल विषयक प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

0
113

मुंबई, दि. 6 : कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी सुरू केली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांनी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

या योजनेत 18 ते 45 वर्ष वयोगटातील युवा- युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खाजगी रुग्णालयामध्ये या क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विना शुल्क प्रशिक्षण देवून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. प्रवेश घेण्याकरीता इच्छुक असल्यास आपली नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 1 ला टप्पा, 2 रा मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर-71 येथे संपर्क साधावा.

कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 022-25232308/97029620255 wcdmumupanagar@rediffmail.com व संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here