बिटकॉइन किमतीत 50 टक्क्यांनी घसरण

0
99

बिटकॉइनची किंमत केवळ 2 दिवसांत 50 टक्क्यांनी घसरली आहे.एप्रिलमध्ये एका बिटकॉइनची किंमत 50 लाख रुपयांवर पोहोचली होती ती आता घसरून निम्मी झाली आहे. भारतात क्रिप्टो करन्सीला (आभासी चलन) मान्यता नाही. बिटकॉइन या आभासी चलनाच्या विरोधात अमेरिका आणि ब्रिटननंतर आता चीनने देखील कारवाई केली.भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर बंदी लावली आहे.

भारतात अंदाजे क्रिप्टो करन्सीचा 1000-1500 कोटी रुपयांचा रोजचा व्यवहार आहे. शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या 2 लाख कोटींच्या दैनंदिन उलाढालीचा हा 1 टक्काच भाग आहे. तरीही यामध्ये एक कोटीपेक्षा अधिक भारतीय गुंतवणूक करत आहेत.क्रिप्टो करन्सीच्या किमती अस्थिर असतात. जेवढ्या झपाट्याने याची व्हॅल्यू वाढते, तेवढ्याच वेगाने त्यात घसरण सुद्धा होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here