सिंधुदुर्ग-अभिमन्यू वेंगुर्लेकर
दिल्ली– भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. बुधवारी (दि.3) रात्री त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना मथुरा रोडवरील अपोलो हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आले आहे. नुकतेच अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-लाडकी-बहीण-योजना-एका-कुट/
अपोलो हॉस्पिटलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली रात्री 9 वाजता अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना 27 जून रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला होता.
.