दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अभिनेता मनोज बाजपेयीदेखील नुकताच कोरोनातून यशस्वी बाहेर पडला आहे.
अभिनेता मनोज बाजपेयी आणि त्याच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या काळातील आपला ‘कठीण प्रवास’ होता, असे मनोज बाजपेयीने सांगितले. घरात क्वारंटाइन असताना स्क्रिप्ट रिडिंग आणि लोकांशी बोलण्यात व्यस्त राहिलो, जे इतर सामान्य दिवसांमध्ये मला करता येत नव्हते. याकाळात मी काही शो आणि चित्रपट देखील पाहिले. घरी आम्ही सर्व वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होतो. आणि दुरूनच बोलायचो. या काळात मुलीपासून दूर राहणे खूप अवघड होते, कारण तिला माझ्यासोबत खूप वेळ घालवायचा होता. तिला माझ्याबरोबर खेळायचे होते. तिला तिच्या ऑनलाइन क्लास आणि होमवर्क करत असताना मी तिच्याजवळ हवा होतो. जे कोरोनामुळे मी करू शकले नाही असेही त्याने सांगितले.