मनोरंजन : ‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

0
68
‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !
‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

मुंबई – ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘सरकार’, ‘कंपनी’ आणि ‘साथिया’ सारख्या हिट सिनेमांसाठी स्टील फोटोग्राफी केलेले बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टील फोटोग्राफर हरदीप सचदेव आता मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. जॅंगो जेडी असं त्यांच्या हा पहिल्या सिनेमाचे नाव आहे. फिल्म मिल प्रा.लि.प्रॉडक्शन्स या बॅनरखाली रोहित भागवत आणि हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, आज या सिनेमाचा ट्रेलर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला. नव्या दमाचा, नव्या पिढीचा असा हा नवा सिनेमा आहे. यशाचा मार्ग तुमच्यातल्या नायकात दडलेला आहे आणि जेव्हा परिस्थिति कठीण असते तेव्हा स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. २६ मे रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राजसिंग-डुंगरपूर-चषक-2/

जेडीची भूमिका अभिनव सावंत याने साकारली असून त्याच्या नायिकेच्या भूमिकेत गौरी नलावडे आहे. या दोघांच्या सोबत आदित्य आंब्रे, योगेश सोमण, डॉ. निखिल राजेशिर्के, वरुण पनवार इ.कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.  

ट्रेलर लिंक – https://www.youtube.com/watch?v=_MKBbJAFq54

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here