मनोरंजन : डिस्ने स्टारवर टाटा आयपीएल २०२३ला मिळाला प्रचंड प्रतिसाद, रेटिंग्समध्ये तब्बल २९% ची वाढ

0
26
डिस्ने स्टारवर टाटा आयपीएल २०२३ला मिळाला प्रचंड प्रतिसाद, रेटिंग्समध्ये तब्बल २९% ची वाढ
डिस्ने स्टारवर टाटा आयपीएल २०२३ला मिळाला प्रचंड प्रतिसाद, रेटिंग्समध्ये तब्बल २९% ची वाढ

पहिल्याच दिवशी १४० मिलियन चाहत्यांनी घेतला थेट प्रक्षेपणाचा आनंद

मुंबई३ एप्रिल२०२३: टाटा आयपीएल २०२३ चे अधिकृत टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर डिस्ने स्टारवर स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी टीव्हीचा* वापर एकूण ८.७ बिलियन मिनिटे घेण्यात आलागेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ४७% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. स्पर्धेच्या उदघाटनाच्या दिवशी १४० मिलियन* दर्शकांनी थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतलायामध्ये उदघाटन समारोहाचा देखील समावेश होता.  गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यानचा पहिला सामना १३० मिलियन* दर्शकांनी पाहिला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-शासनाने-मागण्या-पूर्ण-क/

डिस्ने स्टारचे स्पोर्ट्स – हेड श्री. संजोग गुप्ता यांनी सांगितलेडिस्ने स्टारवर प्रक्षेपित करण्यात येत असलेल्या #IPLonStar ला देशभरातील चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. व्ह्यूइंग कालावधीत झालेली प्रचंड वाढ आमच्या कॅम्पेनचे यश दर्शवते. स्टार स्पोर्ट्सच्या ब्रॉडकास्ट धोरणांना अनुसरून आम्ही हे कॅम्पेन चालवत असून क्रिकेटच्या सामान्यांचा थेट आनंद घेण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य लिनियर टेलिव्हिजनला दिले जात असल्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रिकेटच्या चाहत्यांसोबतचे आमचे गहिरे नाते यामध्ये अधिकच घट्ट केले जात आहे. जगातील प्रीमियर क्रिकेट स्पर्धा ही टाटा आयपीएलची लोकप्रियता यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. कथाकथनाची शक्तीश्रेणीतील सर्वोत्तम कव्हरेज आणि भरपूर कस्टमायझेशन यांच्यामार्फत चाहत्यांना पुरेपूर मनोरंजन व आनंद पुरवण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि पुढे देखील राहू.”

खेळांच्या चाहत्यांमध्ये आणि चाहत्यांना खेळाविषयी वाटणाऱ्या प्रेमामध्ये वाढ व्हावी तसेच खेळाच्या स्पर्धा जास्तीत जास्त दर्शकांनी पाहाव्यात यासाठी प्रोत्साहन देण्यात स्टार स्पोर्ट्स कायम आघाडीवर असते.  चाहत्यांना केंद्रस्थानी ठेवून धोरण आखण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे स्टार स्पोर्ट्सवर प्रत्येक क्षेत्राशी संबंधित फीड्स नऊ भाषांमध्येसामाजिक-सांस्कृतिक घटकांना व प्रत्येक क्षेत्रातील खेळाशी संबंधित वास्तविक परिस्थितीला अनुसरून तयार केली जातात. यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये क्रिकेट पाहणाऱ्या दर्शकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. माजी क्रिकेट खेळाडू आणि विविध भाषांमधील अनुभवीनिपुण ब्रॉडकास्टर्स यांची विशेष स्टार कास्ट‘ टाटा आयपीएल २०२३ प्रस्तुत करत आहे. त्यांच्यासोबत स्टार स्पोर्ट्सचे आयपीएल सूत्रधार – रणवीर सिंग आणि ख्यातनाम तेलगू अभिनेता नंदमुरी बालकृष्ण हे देखील प्रक्षेपणात सुपर-फॅन्सचे प्रतिनिधित्व करत आहेत.

स्टार स्पोर्ट्सचा प्रत्येक उपक्रम हा दर्शकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला असतो आणि त्यामधून शक्य तितका जास्त इमर्सिव्ह अनुभव चाहत्यांना पुरवण्याचा प्रयत्न केला जातोयामध्ये फॅन बससारख्या ऑन-ग्राउंड उपक्रमांचा देखील समावेश असतोइथे चाहते स्टार स्पोर्ट्स तज्ञांना प्रत्यक्ष भेटून खेळाविषयी चर्चा करू शकतात. सर्वांनी एकत्र जमून मॅचचा आनंद घेण्याचा अर्थात वॉचिंग टुडे‘ अनुभव चाहत्यांना त्यांच्या घरी मिळवून देण्याचा उपक्रम देखील स्टार स्पोर्ट्समध्ये चालवला जातो, ‘हर सोसायटी बनेगा स्टेडियम‘ उपक्रमामध्ये चाहत्यांना सर्वात इमर्सिव्ह अनुभव पुरवला जातोदेशभरात आयोजित केल्या जाणाऱ्या स्क्रीनिंग्सया स्टार स्पोर्ट्स तज्ञ उपस्थित राहतात. स्टार स्पोर्ट्सने द इनक्रेडिबल लीग क्वीज‘ ही सर्वात मोठी शालेय क्रिकेट क्वीज देखील सुरु केली आहेज्यामध्ये २०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. आस्क स्टार‘ हा उपक्रम नव्या अवतारामध्ये पुन्हा सुरु करण्यात येत आहेयामध्ये चाहते कमेंटेटर बनून त्यांना ज्यांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत असे प्रश्न विचारू शकतात. हे प्रश्न थेट प्रक्षेपणात दाखवले जातात.

स्टार स्पोर्ट्सच्या शोर ऑनगेम ऑन!‘ कॅम्पेनने स्पर्धेच्या आधी भरपूर उत्साह निर्माण केला. या कॅम्पेनमध्ये चाहत्यांचा उत्साहत्यांची एकजूट यांना प्रोत्साहन दिले जाते. कॅम्पेन फिल्म्समध्ये सुपरस्टार विराट कोहलीरोहित शर्माहार्दिक पंड्यारवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचा सहभाग आहे. सोशल मीडियावर या फिल्म्स खूप लोकप्रिय झाल्या आहेतचाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला असून आपल्या आवडत्या टीम्ससाठी ते चिअर करत आहेत.

स्टार स्पोर्ट्सने एक विशेष स्टार्स ऑन स्टार‘ शो देखील सुरु केला आहे.  यामध्ये दर्शकांना त्यांच्या आवडीच्या हिरोंना व्यक्तिगत पातळीवर जाणून घेण्याची संधी मिळते. आयपीएलला अधिक जास्त स्पेशल बनवणाऱ्या सुपर-फॅन्सचा सन्मान करण्याचे प्रयत्न देखील स्टार स्पोर्ट्स वारंवार करत असतेयाला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. शुक्रवारी टाटा आयपीएल २०२३ सुरु होण्याआधी बिल्ड-अप प्रोग्रामिंग २०० मिलियनपेक्षा* जास्त दर्शकांनी पाहिला. थेट प्रक्षेपणाव्यतिरिक्त देखील या स्पर्धेची लोकप्रियता वाढवण्यासाठी स्टार स्पोर्ट्स बांधील असल्याचे यामधून दिसून येते.

टाटा आयपीएल २०२३ मध्ये अनेक रोमांचकउत्साहवर्धक क्षण निर्माण होतीलस्टार स्पोर्ट्सला खात्री आहे की टेलिव्हिजनवर या सामान्यांचा प्रत्यक्ष आनंद घेत असताना चाहत्यांचा शोर‘ देखील वाढत जाईल. एक्सक्लुसिव्ह सराउंड प्रोग्रामिंग आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने स्टार स्पोर्ट्स एक अतिशय महत्त्वाची स्पर्धा कशी पाहायला हवी याचा उत्तम आदर्श निर्माण करत आहे. टाटा आयपीएल २०२३ ही स्पर्धा अतिशय रोमांचक होणार यात काहीच शंका नाहीदर्शकांना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये सातत्याने वाढ करण्याचे स्टार स्पोर्ट्सचे प्रयत्न देशभरातील दर्शक व चाहत्यांसाठी कायमस्वरूपी संस्मरणीय ठरतील यात काहीच शंका नाही.

*बीएआरसी२+ (शहरी+ग्रामीण)

**बीएआरसीपुरुष १५+एबी (शहरी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here