कोरोना संकटाच्या काळात ग्रामविकास यंत्रणेने महाआवास अभियानाद्वारे अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या योजनेद्वारे गोरगरीब, वंचित घटकांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळाला आहे. राज्यात ग्रामीण भागात स्वत:चे घर नाही असे एकही कुटुंब बाकी राहू देणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील मोहन आत्माराम पाताडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची चावी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांनी दिली .कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील मारुती आत्माराम पाताडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची चावी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली. कणकवली तालुक्यातील नाटळ येथील संजना सिद्धार्थ तांबे यांना रमाई आवास योजनेतील घरकुलाची चावी महिला व बालविकास सभापती शर्वणी गावकर यांच्या हस्ते दिली.कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुक येथील गजानन श्रीधर घाडीगावकर यांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची चावी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.आज महाआवास अभियानातून हक्काचे घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी घराला, स्वत:च्या कुटुंबाला कोरोनामुक्त ठेवण्याचे वचन मला द्यावे, कारण यातूनच गाव आणि राज्याचा कोरानामुक्तीचा प्रवास यशस्वी होणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.न
ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 6,10,06,280 मनुष्यबळ निर्मिती करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलजीवन मिशनमधून 8 लाख 06 हजार 895 घरकुलांना नळाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानमधून 9 लाख 32 हजार 102 घरकुलांना शौचालयाचा लाभ देण्यात आला. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून 7 लाख 27 हजार 031 गॅस जोडणी, सौभाग्य योजनेतून 7 लाख 51 हजार 150 विद्युत जोडणी व 7 लाख 51 हजार 140 लाभार्थ्यांना राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती मिशन मधून 8,10,031 लाभार्थ्यांना उपजीविका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.