देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाऱ्याच्या वेगाने वाढत आहे. देशभरात कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही वाढून 1,45,582 एवढी झाली आहे. राज्याच्या आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रुग्ण सर्वात जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच चालू झालेल्या मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील 10 वी व 12 वीचे वर्ग वगळता इतर वर्गांच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
तसेच महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोरोना रुग्ण सापडलेल्या बिल्डिंग सील करण्याच्या संदर्भातील नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
कोरोना रुग्ण एखाद्या बिल्डिंगमध्ये सापडल्यास मुंबई महानगरपालिकेचे असे नियम आहेत
-एखाद्या बिल्डिंगमध्ये एकूण रहिवाशांच्या 20 टक्के रहिवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास संपूर्ण बिल्डिंग किंवा विंग सील करणार
- -घरीच विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावे लागणार
- -रुग्णांनी लक्षणे लक्षात आल्यापासून कमीत कमी 10 दिवस आयसोलेट राहणे बंधनकारक राहणार आहे
-रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी 7 दिवस घरीच विलगीकरणात राहावे.पुढील आणि पाच ते सात दिवसांच्या आत कोरोना चाचणी करून घ्यावी
-बिल्डिंगमध्ये कोरोना रुग्ण असल्यास संबंधित रुग्ण आणि कुटुंबियांना अन्न, औषध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जाईल, याची काळजी बिल्डिंग कमिटीने घ्यावी. - महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बिल्डिंग कमिटीने संपूर्ण सहकार्य करावे.बिल्डिंगचे सील काढण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेण्यात येईल