मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

0
119

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज(दि.25) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. भरधाव इनोव्हा गाडीने पुढे जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार टक्कर दिली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा गाडी एकदम मोडून गेली आहे.या गाडीचा आकार बघूनच या अपघातातून कुणीही जिवंत राहिले नसणार याची कल्पना येते एवढा हा अपघात भीषण आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचा समोरील टायर अचानक फुटल्याने वेगात असलेली कार कामशेत बोगद्याजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अभिजीत घवले (डेप्युटी कमिशनर जीएसटी माजगाव) आणि शंकर गोडा यतनाल यांचा समावेश आहे. तर, अपघातात वाहन चालक आणि अभिजीत घवले यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पावना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here