तौक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवार २१ मे रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळावर पोहोचतील. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर जातील. तेथून मोटारीने वायरी, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे जाऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेतील. त्यानंतर रत्नागिरीला परत येऊन पुन्हा मुंबईला येतील.