10 वी परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपध्दतीमध्ये सबंधित हेल्पलाईन

0
118

सन 2021-21 या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुनरिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तुरळक विषयक घेऊन प्रविष्ट होणारे परिक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेअतंर्गत प्रविष्ट विद्यार्थी यांचे मूल्यमापनबाबतचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे याबाबतचे परिपत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

प्रशिक्षणाचा व्हिडीओ मंडळाच्या यु-टयुब चॅनेलवर http://mh-ssc.ac.in/faq या लिंकवर दिनां‍क 10 जून 2021 रोजी सकाळी 11.00 पासून उपलब्ध करुन दिलेला आहे. मूल्यमापन कार्यपध्दतीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळनिहाय स्वतंत्र हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार विभागीय मंडळ निहाय संबंधित कार्यालयाचे सहसचिव, सहा.सचिव,अन्य्‍ अधिकारी सबंधितांना हेल्पलाईनव्दारे मार्गदर्शन करणार आहेत.

त्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक खालीप्रमाणे देण्यात येत आहे. कोकण विभाग श्री. भावना राजनोर,सहचिव मोबाईल क्रमांक 8806512288,दिपक पोवार,वरिष्ठ अधिक्षक, मोबाईल क्रमांक 8830384044, ई-मेल आयडी-divchairman.konkan@gmail.com विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. शिवलींग पटवे विभागीय सचिव कोंकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here