जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला लसीकरणामुळे आला बसेल यासाठी लसीकरणाच्या मोहिमेचा आराखडा करण्यात आला होता. लसीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ९१ केंद्रे सुरू करण्यात आली होती. तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे चोख प्रशिक्षणंही देण्यात आले होते.
जिल्ह्यात राबविलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला होता. जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी देण्यात येत होत्या. पण आता जिल्ह्यातील कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपला असून दुसरा डोस देण्यासाठीही मात्रा शिल्लक नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली आहे.