रत्नागिरी: पाच लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम 15 पर्यंत पूर्ण करा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0
156
पाच लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम 15 पर्यंत पूर्ण करा - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

प्रतिनिधी: राहूल वर्दे
रत्नागिरी दिनांक 19: वशिष्ठी नदी व शिवनदी मधील पाच लाख क्युबिक मीटर गाळ 15 मे पर्यंत काढण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. चिपळूण येथील प्रांत कार्यालयात आज त्यांनी शिव नदी, वशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या संदर्भातील आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीमती नारकर, पोलीस विभागाचे सचिन बारी, चिपळूणचे मुख्याधिकारी श्री शिंगटे आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आढावा घेताना श्री.सामंत म्हणाले, शिव नदी व वशिष्ठी नदीमधील आतापर्यंत 2 लाख क्युबिक मीटरपेक्षा जास्त गाळ काढण्यात आलेला आहे. 15 मे पर्यंत 05 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हे काम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून गाळ काढण्याचे काम पूर्ण करा. खाजगी लोकांना मलदा(गाळ) घेऊन जाण्याबाबतचा निर्णय देखील येत्या चार ते पाच दिवसात होईल, असे ते म्हणाले.शिव नदी व वशिष्ठी नदी मधील 15 मे पर्यंत 5 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम पूर्ण होऊन चिपळूणकराना पूराचा त्रास कमी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here