रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग व पोलीस निरीक्षक लाड यांनी सह्याद्रीनगर-नाचणे येथे तोत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना भेटून योग्य खबरदारी घेण्याबाबत सुचना दिल्या. त्यांनी स्वतः रत्नागिरी मिरजोळे येथेही तोत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व तसेच ग्रामस्थांना भेटून योग्य खबरदारी घेण्याबाबत सुचना दिल्या.
समुद्रात रत्नागिरीच्या समांतर असणाऱ्या चक्रीवादळाचा केंद्र मध्य वेगाने उत्तरेकडे सरकण्यास प्रारंभ झाला असून त्यामुळे वाऱ्याची गती देखील कमी झाली आहे.तरीही समुद्र अजून दोन दिवस खवळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही त्यांनी दिला आहे .या कालावधीत वाऱ्याचा वेग 50 ते 60 किलोमीटर प्रतितास राहण्याचा अंदाज आहे.