प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
देवरूख – शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या समस्या सोडविण्या साठी आणि न्याय हक्काच्या लढयासाठी सातत्याने झटणारे चाफवली गावचे प्रतिष्ठीत आंबा काजू बागायतदार श्री दिपक दळवी यांची शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती मा अशोकराव जाधव संस्थापक अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी यांनी केली आहे .
मा दिपक दळवी यांना नियुक्ती देते वेळी महाराष्ट्राचे सरचिटणीस विश्वनाथ किल्लेदार, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री ऊत्तम गायकवाड , संगमेश्वर तालुका अध्यक्ष अनंत धामणे इत्यादी शेतकरी कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते . दिपक दळवी यांचे नियुक्तीने रत्नागिरी जिल्हा शेतकरी कष्टकरी संघटनेत चैत्यन्य निर्माण झाले असुन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास योग्य व्यक्ती नियुक्त केली गेली असल्याची चर्चा जनतेत आहे. जनतेतून श्री दळवी यांचे अभिनंदन होत आहे.