⭐तेलीचा विषय माझ्यासाठी संपला आहे..तेलींच अस्तित्व हे सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच..
प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
सावंतवाडी – : राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे ? एखाद्या मतदारसंघाचा आमदार व्हायचं म्हणून पातळी सोडून टीका ते करत आहेत. तेली यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मी करणार आहे. खालच्या पातळीवर जाऊन बोलायची पण एक मर्यादा असते. मला बोलायचं झालं तर मी खुप काही बोलू शकतो. पण, महायुतीचा धर्म पाळणारा मी आहे. तेलींच अस्तित्व हे सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरत आहे. त्यामुळे यापुढे राजन तेली हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. त्यांच्या टीकेवर उत्तर हे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते देतील असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत तेलींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.मंत्री केसरकर म्हणाले.https://sindhudurgsamachar.in/kokan-नरेद्र-डोंगर-येथे-झाड-कोस/