राजपथ इन्फ्राकॉनने मोडला (दोहा) कतार चा विश्वविक्रम. १८० देशामध्ये भारत देश १ नंबर वर.
श्री.विलास कोळी
राजपथ इन्फ्राकॉन या कंपनीने देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा नॅशनल हायवे नॅशनल हायवे नंबर ६, अमरावती अकोला या शहरांना जोडणारा लोणी ते मुर्तीजापुर रस्ता राजपथ इन्फ्राकॉनने जवळपास ७५ किलोमीटर रस्ता पूर्ण करून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रम करण्याचा संकल्प केलेला होता.हे लक्ष राजपथ इन्फ्राकॉनने अवघ्या ३ दिवस ५ तासात यशस्वीपणे पार पाडले.
यापूर्वी म्हणजे सन २०२१ मध्ये राजपथ इन्फ्राकॉन या कंपनीने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा रस्ता केवळ २४ तासात ३९.६७१ किलोमिटररस्ता तयार करून अभिमानास्पद विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या ह्या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद झाली आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे हे ७५ वे वर्षे. “आजादी का अमृत महोत्सव”. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी मध्यंतरी ‘गतीशक्ती’ या संकल्पनेतून भारत देशाच्या पायाभूत सुविधा उभारणी करिता सर्वच क्षेत्रांमध्ये जी मोठी आर्थिक गुंतवणूक करायचे ठरवले आहे. त्याच्या अंतर्गत विशेषता ‘रस्तेबांधणी’ च्या क्षेत्रात मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट चे आपले देशाचे मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल हायवे नंबर ६. देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा नॅशनल हायवे नॅशनल हायवे नंबर ६, अमरावती अकोला या शहरांना जोडणारा लोणी ते मुर्तीजापुर रस्ता राजपथ इन्फ्राकॉनने जवळपास ७५ किलोमीटर रस्ता पूर्ण करून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रम करण्याचा संकल्प केलेला होता.
लोणी ते मुर्तीजापुरपर्यंतच्या महामार्गाच्या कामाला शुक्रवार दि. ३ जून च्या सकाळी ७.० वाजलेपासून अखंडपणे बिटू मीन्स काँक्रीट ला सुरुवात झाली. रात्रंदिवस २४ तास हा कार्यक्रम न थांबता सुरु होता. रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रसामुग्रीसह ७२८ मनुष्यबळ कार्यरत होते. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी राजपथ इन्फ्राकॉनने (दोहा) कतार येथे यापूर्वी झालेला विश्वविक्रम मोडीत काढला. जागतिक स्तरावर सार्वजनिक कार्य प्राधिकरण- अश्गुल यांनी (दोहा) कतार येथे यापूर्वी विश्वविक्रम नोंदवला होता. यात त्यांनी सुमारे २४२ तास म्हणजेच १० दिवसांचे नॉनस्टॉप २५ किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता. हे लक्ष राजपथ इन्फ्राकॉनने अवघ्या ३ दिवस ५ तासात यशस्वीपणे पार पाडले.
यावेळी राजपथचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जगदीश कदम यांच्यासह सर्व अधिकारी,पदाधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी हा विक्रम झाल्याने जय भवानी जय शिवाजी, वंदे मातरम, भारतमाता की जय अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. आणि पुढील नव्या विश्वविक्रमाची वाटचाल मोठ्या जोमाने सुरु केली. सलग ५ दिवस म्हणजेच दि. ७ जून पर्यंत हा कार्यक्रम चालू होता. जवळपास ७५ किलोमीटर डांबरी रस्ता १०५ तासात पूर्ण केला. विविध यंत्रसामुग्री आणि ७०० हून अधिक कर्मचारी असताना कार्यरत असताना क्वालिटी, सेफ्टी, सेक्युरिटी सांभाळली. कुठलीही अनुचित घटना घडली नाही. ही गोष्ट देखील नियोजन किती पक्के होते हेच दर्शविते.
जगातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रोड व रस्ते बांधणी क्षेत्रातला इन्फ्रास्ट्रक्चर मधला हा विश्वविक्रम केला.या विश्वविक्रमासाठी अभूतपूर्व तयारी व अंमलबजावणी करण्यासाठी राजपथच्या टीमने सूक्ष्म नियोजन केले होते. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार होते. यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअर, व अन्य कर्मचार्यांची टीम तैनात होत्या. ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाली. राजपथ इन्फ्राकॉन प्रा. ली. या रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ठरली आहे. आणि विशेष म्हणजे दि. ७ जून हा राजपथचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जगदीश कदम यांच्या वाढदिवसादिवशी पूर्ण झाले. त्यांना वाढदिवसानिमित्त आणि ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ बद्दल त्यांचे आणि त्यांच्या टीमचे हार्दिक अभिनंदन सर्वांकडून आणि विलास कोळी व समस्त शिवसृष्टी परिवाराकडून करण्यात आले.