राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत वेतोरे वेंगुर्ला सेंटरचा कु.गुरुराज शेणवी पश्चिम महाराष्ट्रात तिसरा!

0
89
राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत वेतोरे वेंगुर्ला सेंटरचा कु.गुरुराज शेणवी पश्चिम महाराष्ट्रात तिसरा

वेंगुर्ला-वैभव गोगटे

राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस वेतोरे वेंगुर्ला सेंटरचा कु.गुरुराज शेणवी या विद्यार्थ्याने पश्चिम महाराष्ट्रात तिसरा येण्याचा मान पटकाविला आहे तर सेंटरच्या इतर पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ श्री साई योगेश्वरी मंगल कार्यालय वेतोरे येथे केंद्र शाळा वेतोरे नंबर एकच्या मुख्याध्यापिका सौ.प्रियांका बालम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अॅबॅकसच्या घेण्यात आलेल्या. सन 2021- 22 या स्पर्धेत तब्बल 4 हजार 500 विद्यार्थी बसले होते त्यात प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस वेतोरे वेंगुर्ला सेंटरच्या कु.गुरुराज शेणवी या विद्यार्थ्याने पश्चिम महाराष्ट्रात तिसरा येण्याचा मान मिळविला आहे. तसेच वीरा गोगटे, दिव्या मांजरेकर, शर्व आपटे, आर्यन शेणवी, दिशा गोगटे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून वेतोरे सेंटरला बेस्ट अॅवॉर्डनी घोषित झाला आहे.

प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस स्पर्धेचे वेतोरे वेंगुर्ला सेंटरच्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना वेतोरे सेंटरच्या संचालिका सौ. आराध्या गोगटे व गिरीश करडे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here