राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर किल्ले रायगडावर उतरवू देणार नाही, शिवप्रेमींचा कडाडून विरोध

0
99

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 6 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणारआहे. मात्र, त्यावरून आता वाद निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली असून राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर किल्ले रायगडावर उतरवू देणार नाही, असं म्हणत शिवप्रेमींनी केला कडाडून विरोध केला आहे.

शिवप्रेमींनी आपला विरोध देर्शवितांना,राष्ट्रपतींच्या दौऱ्याला विरोध नसून पण किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही, असे सांगितले आहे. रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती, केर कचरा उडतो.हि उडालेली धूळ, माती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडते. सुमारे 25 वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध केला जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here