राष्ट्रीय: कम्युनिटी डे चे औचित्य साधून एथर एनर्जी तर्फे फॅमिली स्कूटरची सुरुवात

0
28
एथर एनर्जी तर्फे फॅमिली स्कूटरची सुरुवात
कम्युनिटी डे चे औचित्य साधून एथर एनर्जी तर्फे फॅमिली स्कूटरची सुरुवात

–         हर्मन कार्डन च्या भागीदारी तून एथर तर्फे एथर हालो या पहिल्या स्मार्ट हेल्मेटची सुरुवात

–         नवीनतम अशा एथरस्टॅक ६.० या ओव्हर द एअर सॉफ्टवेअर अपडेटची घोषणा

–         रु  १,०९,९९९ च्या एक्स शो रुम बंगळूरू किंमतीत रिझ्टाचे बुकिंग आता संपूर्ण देशभरांतून करणे शक्य

राष्ट्रीय१०एप्रिल २०२४-  एथर एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी तर्फे आज त्यांच्या एथर कम्युनिटी डेच्या दुसर्‍या पर्वात रिझ्टा या नवीन फॅमिली स्कूटरची सुरुवात केल्याची घोषणा केली.  संपूर्ण परिवाराच्या उपयोगाकडे लक्ष ठेऊन या स्कूटरचे डिझाईन करण्यात आले असून रिझ्टा ने आरामदायकपणा, सोपेपणा आणि सुरक्षेवर लक्ष्य केंद्रित केले आहे.  यामध्ये अनेक नवीन कनेक्टेड वैशिष्ट्ये असून यामुळे चालकाचा अनुभव अधिक समृध्द होण्यास मदत होते.  यामध्ये स्कीड कंट्रोल आणि व्हॉट्सॲप ऑन दी डॅशबोर्ड सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.  अतिशय स्पर्धात्मक अशी याची किंमत असून रिझ्टाची  किंमत (एक्स शो रुम बंगळूरु) रु १,०९,९९९/- अशी आहे. https://sindhudurgsamachar.in/bike-जावा-येझदी-मोटरसायकलतर/

ऑल न्यू रिझ्टा आता २ मॉडेल्स आणि ३ प्रकारात उपलब्ध असून यामध्ये रिझ्टा एस आणि रिझ्टा झेड चा समावेश आहे, याची बांधणी २.९ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरीने युक्त अशी असून रिझ्टा झेडचे टॉप एन्ड मॉडेल हे ३.७ केडब्ल्यूएच ची आहे, यामुळे आयडीसी ची अंदाजे रेंज ही १२३ ‍किमी आणि ३.७ केडब्ल्यूएच ची रेंज १६० किमी ची आहे.  एथर रिझ्टा एस ही ३ मोनोटोन रंगात उपलब्ध असून रिझ्टा झेड ही ७ म्हणजेच ३ मोनोटोन आणि ४ ड्यूअल टोन रंगात उपलब्ध असेल.

एथर एनर्जी चे सहसंस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी सांगितले “ आम्ही दुचाकीच्या बाजारपेठेत ४५० सिरीज या परफॉर्मन्स स्कूटरच्या माध्यमातून प्रवेश केला.  आता आम्ही रिझ्टाच्या माध्यमातून फॅमिली विभागात प्रवेश करत आहोत, या उत्पादनाचे डिझाईन आणि इंजिनियरींग हे भारतीय परिवाराला समोर ठेऊन करण्यात आले आहे.  हे उत्पादन आराम, सुरक्षा आणि कनेक्टेड टेक हे महत्त्वपूर्ण घटक लक्षात घेऊन करण्यात आले आहेत, कारण हेच घटक परंपरागत स्कूटरची खरेदी करतांना लक्षात घेतले जातात.  रिझ्टा एथरच्या गुणवत्ता, विश्वसनीयता आणि सुरक्षा या घटकांचे प्रतिनिधीत्व करत आहे.”

आरामदायक आणि सोपेपणा

एथर रिझ्टा ने नेहमीच आराम आणि सोपेपणाला प्राधान्य दिले आहे, यामधील वैशिष्ट्ये म्हणजे विभागातील सर्वात मोठी सीट ज्यामुळे वापरकर्त्यांना मोठी जागा  आणि मोठा फ्लोअर बोर्ड मिळतो.  त्याच बरोबर रिझ्टा झेड च्या वैशिष्ट्यांमध्ये बॅकरेस्ट असल्याने मागे बसणार्‍या व्यक्तीच्या कमरेलाही आराम मिळतो.  ५६ लीटरची स्टोअरेज स्पेस, ३४ लीटरची सीट खालील क्षमता आणि पर्यायी २२ लीटर फ्रंक ॲक्सेसरी यामुळे एथरचा असा विश्वास आहे की रिझ्टा स्कूटर बाजारपेठेतील सर्वात मोठी स्टोअरेज स्पेस देते, ज्यायोगे रोजच्या गोष्टी वाहून नेणे सोपे जाते.  अंडरसीट स्टोअरेज मध्ये पर्यायी स्वरुपातील  १८ डब्ल्यू पावर आऊपूटचा मल्टीपर्पज चार्जर असल्यामुळे फोन्स, टॅब्लेट्स, पोर्टेबल स्पिकर्स आणि अशीच अन्य उपकरणे चार्ज करता येतात. 

सुरक्षा आणि राईड हँडलिंग

काही वर्षांपासून एथर ने नेहमीच त्यांच्या दुचाकीच्या चालकांच्या सुरक्षा मानकां मध्ये सुधारणा करत अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत.  रिझ्टा मध्ये एथरने प्रथमच स्कीडकंट्रोल सुरु केले आहे.  ही एथरची प्रमुख ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे जी अजोडपणे मोटरच्या टॉर्कवर नियंत्रण आणून ट्रॅक्शन चे नुकसान न होता गाडी ही कमी घर्षण असलेल्या भागावरुन जसे खड्ड्यांसह पॅचेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here