राष्ट्रीय स्तरावरील शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी आवाहन

0
107

सिंधुदुर्ग – केंद्र सरकारच्या जलशक्ती मत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील फिल्मच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लघू फिल्म मेकर यांनी पाणी व स्वच्छता विषयावर लघुचित्रपट तयार करुन 30 जून 2021 पर्यंत केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय, यांच्या वेबसाईटवर सादर कराव्यात, अशी माहिती जिल्हा परिषदचे पाणी व स्वच्छाता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली आहे.

हागणदारी मुक्त गाव अधिक (ओडीएफ +) ला चालना देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण (एसबीएमजी) च्या फेज 2 आणि भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छता फिल्मच्या ‘अमृत महोत्सव’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी विघटनशिल कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, ग्रे वॉटर मॅनेजमेंट, मैला गाळ व्यवस्थापन या विषयावर शॉट फिल्म बनवायाची आहे.

चित्रपटाचा कालावधी 1 ते 5 मिनिट या दरम्यान असणार आहे. या स्पर्धेसाठी 10 वर्षावरील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात. ही शॉर्ट फिल्म मान्यताप्राप्त भारतीय कोणत्याही बोली भाषेत तयार करु शकता. या स्पर्धेच्या अधिक माहिती साठी आपण तयार केलेली शॉट फिल्म उपलोड करिता व बक्षिस रक्कमांच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या https://innovateindia.mygov.in/sbmg-innovation-challenge/ या वेबसाईटला भेट द्यावी. जिल्ह्यातील शॉर्ट फिल्म मेकर यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here