रेमडेसिवीरचा साठा वितरणासाठी उपलब्ध

0
105

रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे.सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते.वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा करण्यात येतो.

केंद्र शासनाचे पत्र दिनांक २४/०४/२०२१ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण ४,३५,००० रेमडेसिवीरचा साठा दिनांक- २१/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ या कालावधीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.त्यानुसार दि.२१/०१/२०२१ ते २८/०४/२०२१ अखेर पर्यन्त २,९८,०२४ इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना करण्यात आला आहे.

पुढील कालावधीत उर्वरित साठा प्राप्त होणे अपेक्षित आहे. दिनांक- २८/०४/२०२१ रोजी राज्यात २८९४५ इतका साठा वितरीत झाला आहे. दिनांक- २९/०४/२०२१ रोजीच्या वितरणासाठी अंदाजे ३०,००० इतका साठा वितरणासाठी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. अशी माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here