रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमधून बाहेर पडला

0
85

कोरोनाची दाहकता पसरत असतानाच देशातील जनतेला आरोग्यसुविधांच्या तोकडेपणाला सामोरे जावे लागले.अशातच अनेक घरातील कर्ते लोक बळी पडले .या दाहकतेत आणखीन भर पडली ती औषधांच्या तुटवड्याने ! रेमडेसिवीर या इंजेक्शनची उपलब्धता संपूर्ण देशातच कमी असल्याचे आढळले.दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल ३० ते ४० हजारांना विकले गेले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला रेमडेसिवीर इंजेक्शन बनवण्याची परवानगी मिळवून दिली. त्यानंतर कंपनीत ५ मे रोजी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली .आज कंपनीतून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर पडला आहे. वर्धा इथे उप्तादित झालेले हे इंजेक्शन नागपूरसह राज्यभरात वितरीत केले जाणार आहेत. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल सभेत हे इंजेक्शन सुपुर्द करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here