योजना/Schemes

पीएम स्वानिधी योजना 2022

पीएम स्वानिधी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक पीएम स्वानिधी जाणून घ्या योजनेबाबतची सविस्तर माहिती –

या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ ज्या गरजू लोकांना 10000 रुपयेपर्यंतची गरज आहे अशांना अर्थसहाय्य घेता येते. परंतु यासाठी लाभार्थींनी मार्च महिन्याच्या पूर्वा आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडावा म्हणजेच लिंक करावा लागेल

पीएम स्वानिधी योजना असे केंद्र सरकारच्या या योजनेचे नाव आहे.

या योजनेंतर्गत सरकार रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाऱ्यांना 10000 रुपयांचे अर्थसाहाय्य करते.

विशेष म्हणजे लाभार्थींना कोणतीही हमी देण्याचीही गरज नसते.

विशेष म्हणजे तुम्ही कर्जाची परतफेड वेळेत केली तर तुम्हाला त्यावर सरकारकडून अनुदान मिळते.

पीएम स्वानिधी योजनेचा लाभ

सलून पार्लर,

मोची,

पानटपरी,

धोबी,

भाजी विक्रेते,

फळ विक्रेते,

रस्त्यावरील खाद्यपदार्थ,

चहाचे स्टॉल,

चाट भंडार,

भजे-पकोडेवाले,

अंडी विक्रेते,

फेरीवाले,

स्टेशनरी विक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

– शहर, निमशहरी, ग्रामीण, रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज मिळू शकते

– रस्त्यावरील विक्रेत्यांना एका वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंत तारण मुक्त कर्ज मिळू शकते

– तुम्ही कर्ज वेळेवर भरल्यास, तुमची सबसिडी तुमच्या खात्यात जमा होईल.

– कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागणार नाही.

– तुम्ही हे कर्ज मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता. जर विक्रेत्याने पीएम स्वानिधी योजनेत मिळालेल्या कर्जाची नियमित परतफेड केली तर त्याला वार्षिक 7 टक्के व्याज अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

– व्याज अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तिमाही आधारावर थेट पाठवली जाई

लाभार्थींना मार्च महिन्यापूर्वीच आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. हे कर्ज 24 मार्च 2020 पूर्वी किंवा त्यापूर्वी लाभ घेतलेल्या लोकांनाच मिळेल. या कर्जाच्या योजनेचा कालावधी फक्त मार्च 2022 पर्यंत आहे. त्यामुळे ज्या लाभार्थी पुन्हा अर्थसाहाय्य घेवू इच्छीत असाल त्यांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी.