बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो खूप प्रसिद्ध आहे. काही लोक केवळ अमिताभ बच्चन यांच्यासाठी हा शो पाहतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिली आहे.
त्यात त्यांनी लिहिली आहे कि “तुटलेलं बोट, सांध्यावर फ्रॅक्चर आणि असह्य वेदना…. यावर प्लॅस्टर करता येत नाही त्यामुळे मी निराश झालोय… कारण यासाठी अद्याप कोणतीही पद्धत सापडली नाही. म्हणून एक प्रभावी काम केले गेले आहे, सामान्य भाषेत याला ‘बडी टॅपिंग’ म्हणतात…तुटलेले बोट सहानुभूती आणते … आता ते 4-5 आठवड्यांसाठी टेप करण्यात आलं आहे.”
पुढचे चार ते पाच आठवडे बिग बी अमिताभ यांच्या पायावर अशी पांढरी पट्टी असणार आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.