मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. भाजपचे नेते नारायण राणे यांनी जामीन मिळाल्यानंतर रात्री उशिरा साडेबारा वाजता ट्वीट केले.या ट्विटमध्ये त्यांनी ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले आहे. जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे आपल्या कुटुंबासह बुधवारी पहाटे पावणे पाच वाजता मुंबईसाठी रवाना झाले. ते आज मुंबईतील जुहू बंगल्यावर विश्रांती घेणार आहेत. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवारपासून चिपळून येथे पुन्हा त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होणार आहे.
नारायण राणे यांनी वादग्रस्त आणि समजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे मंगळवारी त्यांना संगमेश्वर येथून रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना महाड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर करण्यात केल. कोर्टाने त्यांना रात्री उशिरा 4 अटींसह जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त दोन शब्दामध्ये ट्वीट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.