सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन

0
110
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2022 करीता मंजूर असलेल्या 1) सुईंग टेक्नॉलॉजी, 2) कारपेंटर, 3) कोपा, 4) इलेक्ट्रीशियन 5) मोटर मेकॅनिक होईल, 6) फिटर 7) टर्नर, 8) वायरमन तसेच 9) आयसीटीएसएम या व्यवसायांकरिता प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चित करणे व ट्रेड विकल्प भरणेबाबतची प्रक्रीया https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 23 जुलै 2022 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र.फ.पाटील, यांनी केले आहे..

प्राथमिक गुणवत्ता यादी दिनांक २५.७.२०२२ रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल व उमेदवारांना SMS द्वारे कळविले जाईल किंवा स्वतःच्या Login मधून आपला गुणवत्ता क्रमांक पहाता येईल. गुणवत्तेबाबत कोणताही आक्षेप, हरकत असल्यास तसेच अर्जातील काही निवडक माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास उमेदवारांने आपल्या नजिकच्या आयटीआयमध्ये जाऊन दिनांक २५.७.२०२२ ते २६.७.२०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती नोंदवाव्यात. त्यानंतर बदल करता येणार नाही.

प्रत्येक प्रवेश फेरीच्या आदल्या दिवशी निवड यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करून उमेदवारांना SMS द्वारे कळविण्यांत येईल. फेरीच्या दिनांक आपल्या अर्ज, सर्व मूळ कागदपत्रे, झेरॉक्स व शुल्कासह उमेदवारांनी हजर रहावे.

पहिली प्रवेश फेरी दिनांक ३०.७.२०२२ ते ३.८.२०२२, दुसरी फेरी ८.८.२०२२ ते १२.८. २०२२, तिसरी फेरी १७.०८-२०२२ ते २०.८.२०२२ व चौथी फेरी २४.८.२०२२ ते २७.८.२०२२ या कालावधीत होणार आहे.

चार प्रवेश फेरीऱ्यानंतर शिल्लक जागांसाठी संस्थस्तरावर समुदपदेश फेरीची कार्यवाही दि. ३०.८.२०२२ पासून सुरु होणार आहे. प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाऊन पहावे. प्रवेशाचे प्रसिध्द करण्यांत आलेले वेळापत्रक हे सूचक दर्शक असून त्यामध्ये बदल संभवतो. तरी प्रवेशोच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रीयेबाबत अधिकच्या माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावंतवाडी,मु.सावंतवाडी (बाहेरचावाडा), ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग,दूरध्वनी क्र. (०२३६३) २९५१३६ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३३०४७३५, ९४२०९१०९१२ वर संपर्क साधावा असे, असेही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.पाटील यांनी कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here