कणकवली : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरण भाजपचे आमदार नितेश राणे यांना अडचणीत आणत आहे. कणकवली पोलिसांनी आज नितेश राणे यांची चौकशी केली हि चौकशी सुमारे एक तास चालली असल्याची माहिती हाती आहे वकील देसाई यांच्याबरोबर नितेश राणे कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले होते.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता आणि या हल्यामुळे नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांची अटकपूर्व जामीनाची मागणी फेटाळली.आता राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.