सिंधुदुर्ग:मनोधैर्य योजना समितीवर महिला व बालविकास क्षेत्रात काम करण्यास इच्छुक महिला सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहन

0
78

सिंधुदुर्ग: मनोधैर्य योजनेअंतर्गत पिडीत व्यक्तिंना नुकसान भरपाई देण्याच्या योजनेची अंमलबजावणी ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे सोपविण्यात आलेली आहे. मनोधैर्य योजना समितीवर महिला व बालविकास क्षेत्रात काम करणाऱ्या महिला समाजसेविकेला एक वर्षाच्या कालावधीकरिता सदस्य म्हणुन नामनिर्देशित करणे आवश्यक आहे. तरी दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीकरिता महिला व बालविकास क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला समाजसेविकेची सदस्य काम करणेची इच्छा आहे.

त्यांनी आपला अर्ज, नांव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक व माहिती परिचय बायोटाटा हा दिनांक 4 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात किंवा secretarydlsasin289@gmail.com या ई-मेलवर पाठवावा असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here