सिंधुदुर्ग– सन 2021-22 हंगामासाठी शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या भातासाठी 1 हजार 940 रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने भात शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्यांची विक्रीसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाईन नोंदणीसाठी जिल्ह्यात 22 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांनी दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाचे अधारभूत किंमत धान खरेदी योजनेकरिता शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था काम पाहते. हंगाम 2021-22 करिता शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या धान (भात) करिता 1 हजार 940 रुपये प्रती क्लिंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांकरिता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे.
त्यानुसार मार्केंटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यात 22 ठिकाणी नोंदणी केंद्र सुरू केली असून (1)सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, कोलगाव, मडूरा, तळवडे, भेडशी डेगवे. (2) कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघा लि. कुडाळ, माणगाव, कडावल, कसाल, घोटगे. (3)शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. कणकवली, (4)वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. वेंगुर्ला, (5) देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. देवगड, पडेल, पाटगाव. (6) मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. पेंडूर. (7) वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. वैभववाडी. (8) सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ, लि. ओरोस, कट्टा. येथे नोंदणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. धान/भात खरेदी ही शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगाम 2021-22 मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा मुळ सातबारा 8अ चा मूळ उतार प्रत, आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स सोबत आणावी. शासनाने हतीभाव खरदी केंद्रावर धान विक्री करिता शेतकरी नोदणीची मुदत 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी उद्याप नोंदणी केली नाही त्यानी त्वरित वरिल 22 ठिकाणी संस्थेच्या कार्यालयाशी अथवा जिल्हा मार्केटिंग कार्यालय सिंधुदुर्ग खडपकर कॉम्लेक्स ओरोस फाटा, दुसरा माळा, मुबई गोवा हायवे ब्रीज जवळ ओरोस. तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग येथील बाजार समितीच्या कार्यालयाशी , आपल्या तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालय अथवा कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. खाडे यांनी दिली.