सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून पुन्हा २५ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त

0
125

येत्या मंगळवारी अजून २५ हजार लसीचे डोस देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही,आमदार वैभव नाईक यांची माहिती

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा २५ हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात करण्यात आला आहे.तर येत्या मंगळवारी अजून २५ हजार लसीचे डोस देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.

गणेशचतुर्थी हा सण काही दिवसांवर असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुसंख्येने चाकरमानी दाखल होतात. परंतु कोरोनाचे संकट कायम असल्याने लसीकरण होणे गरजेचे आहे.त्यामुळे ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्यावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा भर असून मागील दोन आठवड्या पूर्वी सिंधुदुर्गसाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून २० हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला होता.

मागील आठवड्यात जिल्ह्यासाठी २१ हजार कोविड लसी पुरविण्यात आल्या होत्या. चार दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी २६ हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला व आज पुन्हा २५ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त झाले आहेत.याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आ.वैभव नाईक यांनी आभार मानले आहेत.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here