ओरोस: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2022 च्या इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे इ.8वी चे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2022 या कालावधीत व शुल्क भरण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी दिनांक 2 मे 2022 रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभाग प्राथमिक यांनी कळविले आहे.
या परीक्षा दि.20 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घेण्याचे प्रस्तावित असून, शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थ्यी अर्ज भरण्यासाठी दि. 23 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत व शुल्क भरण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी दिनांक 2 मे 2022 रोजी पर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे.
कोणत्याही परिस्थितीत दि.30 एप्रिल 2022 नंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 2 मे 2022 नंतर शुल्क भरता येणार नाही. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 01 यांनी कळविण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रविष्ठ व्हावे व अर्ज भरण्यासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणधिकारी यांनी केले आहे