सिंधुदुर्ग- राजापूर एस टी आगारात प्राथमिक शिक्षक यांनी ड्युटी लावण्यात आल्यामुळे शिक्षक संघटना नाराज झाल्या आहेत याबाबत त्यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर याची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली यावेळी शिक्षकांना अशा प्रकारे काम लावणाऱ्या रत्नागिरी व जामनेर मधील अधिकारी यांची चौकशी लावणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, विजयकुमार पंडीत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, नामदेव जांभवडेकर, सचिन मदने आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.