सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांनी सांगितले की, सिडको लवकरच 89 हजार घरांची लॉटरी काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.लॉटरीतील ही नवीन घरे पनवेल परिसरात असल्याची माहिती समोर येत आहे.महागृहनिर्माण योजने अंतर्गत सिडको महामंडळाने 2018-19 रोजी 14 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीतील विजेत्यांना आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांचे वाटप कऱण्यात आले.
सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2018-19 मध्ये 14,838 घरांची लॉटरी काढण्यात आली होती. ही घरे नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 11 ठिकाणी बांधण्यात आली होती. यापैकी 100 सदनिका धारकांना आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांचे वाटप करण्यात आले. सिडकोने एकूण 14,838 घरांसाठी काढलेल्या या लॉटरीपैकी 5262 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर 9,576 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही घरे 1 बीएचके प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र 25.81 चौ. मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र 29.82 चौ. मी. इतका आहे.