सुनिल शेट्टीचा मुलगा अहानचा पहिला चित्रपट ‘तडप’ या दिवशी होणार रिलीज!

0
93

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा पहिला चित्रपट ‘तडप – एक अविश्वसनीय प्रेम कहाणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. तडप चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नाडियावाला ग्रँडसन एंटरटेन्मेंटच्या या चित्रपटात अहान शेट्टीसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे.

‘मोठ्या पडद्यावर ही जादू पाहा. साजिद नाडियावालाचा ‘तडप’ 3 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात येत आहे. ही एक अविश्वसनीय प्रेम कहाणी आहे. ज्याचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले आहे.’ अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. ‘तडप’ चित्रपट तेलुगू हिट रोमँटिक एक्शन ड्रामा फिल्म ‘आरएक्स 100’चा रीमेक आहे. ज्यामध्ये कार्तिकेय गुम्माकोंडा, पायल राजपूत, राव रमेश आणि रामकी मुख्य भूमिकेत आहेत. हा तेलुगू चित्रपट खूपच सुपरहिट ठरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here