अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण:

0
176

एनआयए मुकेश अंबानींच्या अँटिलिया घराच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या जिलेटीनच्या काड्या ठेवलेल्या कारचा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करत आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेने (ANI) या प्रकरणी 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या 5 दिवसांपूर्वी या प्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये 10 जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. 

सचिन वाझे दर महिन्याला एका कॉल गर्लला 50 रुपये पगार द्यायचा असा खुलासा एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये केला आहे.ती महिला वाझेला 2011 पासून ओळखत असल्याचे एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये दावा केला आहे.

मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी 45 लाख दिले असल्याचा दावाही एनआयएने आपल्या आरोपपत्रात केला आहे. मनसुख हिरेनला मारण्यासाठी एका फेसटाईम अ‍ॅपच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असा आरोपात खुलासा करण्यात आला आहे. या फेसटाईम अ‍ॅपला सक्रिय करण्यासाठी एका जीमेल आयडीचा वापर केला गेला होता.फेसटाईम खात्याचे पहिले नाव कुरकुरे आणि शेवटचे नाव बालाजी असल्याचे तपास यंत्रणेने एनआयएला सांगितले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया प्रकरणातील तपासाला दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालाशी छेडछाड केली होती. ज्यासाठी परमबीर सिंगने 5 लाख रुपये रोख सायबर तज्ञांना दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here