मराठीतील बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अंजिक्य’चा दमदार ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.चित्रपटाची कथा ग्रामीण आणि शहरी भागांतील आर्थिक परिस्थितीवर बेतलेला आहे. येत्या 19 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटात जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील यांच्यादेखील भूमिका आहेत.