अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून होणार सुरु!

0
142

अकरावीच्या प्रवेशांसाठी (11th Admission in Maharashtra) सीईटी परीक्षा (CET Exam) घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई हायकोर्टानं (Mumbai Highcourt) रद्द केला. दहावीच्या मूल्यांकनाच्या (Special Assessment system) आधारावरच अकरावीला (11th Admission) प्रवेश देण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला (Maharashtra Government) दिले आहे. त्यामुळे आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे.

त्यानुसार, राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (BMC), पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad), नागपूर (Nagpur), नाशिक (Nashik) आणि अमरावती (Amravati) या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच (Online Admission Process) होणार आहेत. पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला (11th Online Admission) 14 ऑगस्टपासून म्हणजे उद्यापासून सुरुवात होणार आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे. अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थ्यी स्वत:चा लॉग इन आयडी (Log in ID) आणि पासवर्ड (Password) तयार करुन रजिस्ट्रेशन करु शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राऊंड 22 ऑगस्टपासून सुरु राहणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here