सिंधुदुर्ग: केंद्र शासनाच्या सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी विविध खेळ प्रकार आयोजित केले जातात.केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्याक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्या त्या त्या राज्यात आयोजित केल्या जातात.
स्पर्धाकरिता शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेले खेळाडूंनी खालील खेळ प्रकारात टेबलटेनिस,बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम,बुध्दीबळ, ॲथलेटिक्स, लघुनाटय, कबड्डी, वेटलिफटींग, पॉवरलिफटींग, शरिरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी सहभाग नोंदवण्याकरिताचे आवेदनपत्र कार्यालय प्रमुख यांच्या स्वाक्षरीने व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शिफारशीने व्यवस्थपक, सचिवालय जिमखाना मुं.400032 यांचेकडे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत टपालाने ,व्यक्तीश: पाठावावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.