अतुल बंगे दाम्पत्यांची हुमरमळा वालावल गावातील सर्व सामान्यांसाठी जनसेवा सुरूच!

0
29
अतुल बंगे दाम्पत्य
अतुल बंगे दाम्पत्यांची हुमरमळा वालावल गावातील सर्व सामान्यांसाठी जनसेवा

⭐रेशनकार्ड, उत्पन्न दाखले मोफत हुमरमळा गावातील लोकांना देण्याचा सतत उपक्रम!

कुडाळ (प्रतिनिधी)– हुमरमळा वालावल गावातील लोकांसाठी देवदूत म्हणुन काम करणारे अतुल बंगे हे दाम्पत्य मोफत उत्पन्न दाखले व नविन रेशनकार्ड देण्याचा उपक्रम सतत सुरू ठेवला असुन या मध्ये सर्वसामान्य लोकांच्या हेलपाटे मारणे हा त्रास कमी होत आहेत.

हुमरमळा वालावल गावातील जनतेसाठी सतत कार्यरत असणारे सर्व सामान्यांचे देवदूत म्हणून अतुल बंगे आणि सौ अर्चना बंगे हे दाम्पत्य कार्यरत असुन विशेष उत्पन्न दाखले असो वा रेशनकार्ड असो एकही दीवस तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात न जाता स्वखर्चाने हे दाम्पत्य घरपोच सेवा गेली कित्येक वर्षे देत आले आहेत.

या दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे स्वतः तयार करुन एकदाच लाभार्थी यांची सही घेऊन आपणच तहसीलदार कार्यालया पर्यंत पोचवत असतात विशेष म्हणजे या कामासाठी झेरॉक्स किंवा सेतु सुविधा मध्ये लागणारी फी सुध्दा भरुन मोफत सुविधा दिली जाते.

रस्ते पाणी आणि विज, आणि शासकीय योजनांचा लाभ हुमरमळा वालावल गावातील लोकांना मिळवून देणे हा हातखंडा बंगे दाम्पत्यांचा आहे. विशेष म्हणजे तलाठी, सर्कल, तहसीलदार कार्यालयात श्री. बंगे यांच्या कामाबद्दल कायमच कौतुक केले जाते.
संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे असताना निराधार लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळवुन देऊन गोरगरीबांचे आशिर्वाद घेऊन आजही ही सेवा सुरू ठेवली असुन सौ. अर्चना बंगे यांचे महिला बचत गटांचे कामही आदर्शवत आहे. आज हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील श्री सुमन गणपत चव्हाण याला नवीन रेशनकार्ड आणि उत्पन्न दाखला देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here