सिंधुदुर्ग: माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आणलेल्या चांदा ते बांदा योजनेतून आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून भात कापणी मशीनचे वाटप माणगांव येथील शेतकऱ्यांना करण्यात आले होते.आता शेतकरी या अत्याधुनिक यंत्राचा वापर करून भात कापणी करत आहेत.या माध्यमातून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले जात असून शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे.